المدة الزمنية 12:57

रुपेश गोळे कशी करतात ऑरगॅनिक स्ट्रॉबेरी एकदा पहाच | Organic Strawberry Farming in India | IFE

37 225 مشاهدة
0
870
تم نشره في 2020/01/27

Follow us: Facebook:https://www.facebook.com/IndianFarmerEntrepreneurs/ Instagram: https://www.instagram.com/aniketgharge23/ Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com #IFE #StrawberryFarming ---------------------------------------------------------------------- रुपेश गोळे- 9359264247 रुपेश गोळे यांच्या पी.एस.गोळे.ऑरगॅनिक स्ट्रॉबेरी फार्मला भेट दिली.त्यांचा फार्म पांचगणी पासून 5 कि.मी.वर भोसे यागावी आहे. रुपेश गोळे व त्यांचे कुटुंबीय बऱ्याच वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत.स्ट्रॉबेरीचे पीक चांगले यावे म्हणून रासायनीक खताचा वापर गोळे कुटुंबीय करत होते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून रुपेश गोळे संपूर्णपणे सेंद्रिय स्ट्रॉबेरी करत आहेत. रुपेश यांचे शिक्षण पांचगणी येथे इंग्लिश मिडीयम मधून बारावी पर्यंत झाले आहे. शेतीची आवड असल्याने ते आपल्या शेतावर आता विविध प्रयोग करत आहेत. रुपेश यांनी 2 एकर मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. कॅलिफोर्निया येथून मदर प्लांट आणून वाई मध्ये नर्सरीमधून बेबी प्लांट तयार केले जातात.त्यानंतर शेतावर आणून सरीमध्ये ते लावले जातात. ऑगस्टमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर 3 महिन्यांमध्ये स्ट्रॉबेरी काढण्यास येथे ही काढणी 3 महिने चालते. यामध्ये शेणखताचा तसेच जीवामृतचा वापर ते पूर्णपणे करतात. महाबळेश्वर, पांचगणी येथे कमी तापमानामध्ये स्ट्रॉबेरीचे पीक चांगले येथे.सेंद्रिय मध्ये स्ट्रॉबेरी करत असल्याने मानवी श्रम सुद्धा कमी झाले आहे. सेंद्रियमध्ये स्ट्रॉबेरी करत असल्याने त्याचे उत्पादन निम्मे झाले आहे परुंतु त्याची किंमत दुप्पटी पेक्षा जास्त झाली आहे.सेंद्रिय स्ट्रॉबेरी करण्यासाठी त्यांना रेड स्टोन ऑरगॅनिक फार्मच्या मोना पत्राव मॅडम यांनी प्रेरणा दिली व Two Brothers Organic Farms चे हांगे ब्रदर्स यांनी मार्केटिंगमध्ये मदत केली. रुपेश यांची संपूर्ण स्ट्रॉबेरी मुंबई व पुण्यामध्ये जाते.शनिवारी व रविवारी ते मुंबई मध्ये ऑरगॅनिक फार्मर मार्केट करतात तेथून त्यांचे बरेच ग्राहक तयार झाले आहेत. सेंद्रिय शेती करण्याआधी त्याची मार्केटिंग करणे खूप महत्त्वाचे असते. सेंद्रिय मालाला योग्य ग्राहक मिळाले तर त्याला भावपण चांगला मिळतो व मिळणारे उत्पन्नसुद्धा वाढते. रुपेश यांच्या स्ट्रॉबेरीला किलोला 300 रुपये भाव मिळतो. एक एकर मधून त्यांना खर्च वजा जाता 10 लाख एवढे उत्पन्न मिळत आहे. रुपेश गोळे- 9359264247

الفئة

عرض المزيد

تعليقات - 50